' लेसर उपचार '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
' कुलटच ' एन्डोव्हिनस लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्सचा उपचार असताना ऑपरेशन कशासाठी ?
व्हेरिकोज व्हेन्ससाठी सामन्यत: केले जाणारे ऑपरेशन म्हणजे व्हेन स्ट्रिपींग. यात जांघेपासून पायाच्या घोट्यापर्यंतच्या शीरेत एक केबल घालून ती ओढून काढतात. हि एक पूर्ण भुलेखालील मोठी शस्त्रक्रिया असून यासाठी ऍडमिट तर व्हावेच लागते परंतु टाक्याचे व्रण आणि दुखणे सहन करून सुद्धा पूर्ण बरे होण्यास कित्येक महिन्याचा कालावधी लागतो. म्हणूनच बऱ्याच जणांचा कल असे ऑपरेशन टाळण्याकडे असतो. परंतु आता पायाच्या फ़ुगलेल्या, खराब दिसणाऱ्या शिरा आणि त्यामुळे होणार त्रास सहन करत बसून राहण्याची काहीही गरज नाही कारण ' कुलटच ' लेसरने कोणताही त्रास न होता, त्या हळुवारपणे बंद केल्या जातात.
१९९० चे दशक संपताना व्हेरिकोज व्हेन्स च्या ऑपरेशनला पर्याय म्हणून इंजेक्शन स्क्लेरोथेरपी, रेडिओ फ्रीक्वेंसी आणि एन्डोव्हिनस लेसर या उपचार पध्द्ती उदयास आल्या. यापैकी एन्डोव्हिनस लेसर मुले व्हेरिकोज व्हेन्स ने पीडित रुग्णांच्या पायांना जणू नवसंजीवनीच मिळवून दिली आहे.
सर्व एन्डोव्हिनस लेसर्स सारखी नसतात !
एन्डोव्हिनस उपचाराच्या यशस्वितेत सिंहाचा वाटा हा लेसरच्या तरंगलांबीचा असतो. ' कुलटच ' ची १३२० नॅ. मी. तरंगलांबी अतिशय परिणामकारक तर आहेच परंतु ती रुग्णांसाठी आरामदायी सुद्धा आहे. कारण खराब शिरा बंद करण्यासाठी तिला डायोड लेसरच्या १५ वॅटच्या तुलनेत फक्त ५ ते ६ वॅट इतकी कमी एनर्जी वापरावी लागते.
डायोडच्या ८१०,९४० आणि ९८० तरंगलहरी शिरेतील रक्तात शोषल्या गेल्याने निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णेतेने शीर फुटू शकते आणि म्हणूनच वेदना सूज तसेच रक्त साकळणे आणि त्वचा बधिर होण्याचे प्रमाण डायोड लेसरच्या उपचारानंतर जास्त आहे. मात्र कुलटचची १३२० नॅ. मी. तरंगलांबी हि रक्तात जास्त न शोषली जाता सरळ शिरांच्या भिंतीत शोषली गेल्याने वरीलपैकी कोणतेही दुष्परिणाम आढळत नाहीत.
सध्या वापरत असलेल्या एन्डोव्हिनस लेसरमध्ये ' कुलटच ' प्रणाली हि सर्वात सुरक्षित आणि अतिशय परिणाम कारक तर आहेच पण त्याच बरोबर रुग्णांना कसलाही त्रास न देता ती खराब शीर बंद करण्याचे आपले कार्य करून ' कुलटच ' हे नाव सार्थ करत आहे.
म्हणूनच आता
सर्वोत्कृष्ठ ' कुलटच ' एन्डोव्हिनसचाच आग्रह धरा !
कलर डॉपलर स्कॅनिंगचा फायदा
तुमच्या पायातील खोल तसेच त्वचेखालील अशा सर्व शिरांचे स्कॅनिंग डुप्लेक्स कलर डॉपलर द्वारे सुरवातीलाच केलेले असते. 'कुलटच' लेसरची संपूर्ण प्रक्रिया सुद्धा कलर डॉपलर स्कँनिंग करता करता केली जात असल्याने फक्त खराब शिराच बंद केल्या जातात आणि त्या बंद झाल्या की नाही हे सुद्धा त्वरित तपासून पाहता येते.
' कुलटच ' चे कार्य
जसे सलाईन लावतात तसे एका सुईतून ०.६ मी मी इतका बारीक पण लांब काच तंतू (ग्लास फायबर) पायाच्या खराब शिरात हळुवारपणे घातला जातो. या फायबरच्या टोकातून लेसर किरण बाहेर पडत असताना तो पुलबॅक मशीनने हळूहळू मागे ओढला जातो. खराब शिरांच्या भिंतीत १३२० नॅ. मी. लेसर शोषला गेल्याने त्या शिरा आकुंचन पावून लगेचच बंद होतात आणि त्यांच्यातुन खाली उलट्या दिशेने वाहत होता तो रक्तप्रवाह इतर चांगल्या शिरामध्ये वरच्या दिशेने आपोआप मार्गस्त होतो. अशा रीतीने फुगलेल्या व्हेरिकोज व्हेन्स बंद झाल्याने दिसेनाशा होतात.
ऍडमिट होण्याची गरज नाही
'कुलटच' लेसर करतेवेळी तुम्ही जागे असता कारण तुमचे फक्त पायच बधिर केले जातात. या करीता आम्ही ' वॉकिंग इपिड्यूरल ' हे बधिरीकरणाचे आधुनिक तंत्र वापरत असल्याने प्रोसिजर संपता संपता पायातील टाकत परत येऊ लागते. थोड्याच वेळात तुम्ही चालू लागता आणि स्थानिक रुग्ण सायंकाळी घरी जाऊ शकतात.
नसांना इजा होत नाही
पायाला संवेदना पुरविणाऱ्या बहुतांशी नसा या पायातील शिरांना लागून लागून असतात. डायोड लेसरच्या तरंगलहरी काही वेळा शरीराबाहेर पसरल्याने जवळच्या नसांना इजा होऊन त्यामुळे पायाची ठिकठिकाणची त्वचा बधिर होणे अथवा थेतील संवेदना बदलणे असे घडू शकते. १३२० नॅ. मी. ट्रँगलहरी फक्त शिरांच्या भिंतीपर्यंतच सीमित राहत असलेने अशा दुष्परिणामांची शक्यता आणि तीव्रता अगदीच नगण्य असते.
पायावर व्रण राहत नाहीत
एन्डोव्हिनस लेसरची पूर्ण प्रक्रिया सुईतून केल्यामुळे कुठेही छेद अथवा टाके नसतात आणि त्यामुळे पायवर व्रण राहत नाहीत.
वेदनांपासून त्वरित मुक्ती !
व्हेरिकोज व्हेन्समुळे होणार त्रास कमी होण्यास सुरवात तर लगेचच होते परंतु त्याच्या तीव्रतेनुसार पूर्ण आराम मिळण्यास मात्र काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो .
पूर्ववत कामावर रुजू व्हा आणि तेही लवकर !
'कुलटच' लेसर नंतर पायाला घट्ट बसणारे ' स्टॉकिंग्ज' घालतात. दुसऱ्या दिवसापासून तुम्ही घरघुती हलके काम करू शकता आणि तुमच्या व्हेरिकोज व्हेन्सच्या तीव्रतेनुसार काही आठवड्यातच तुमचे नेहमीचे श्रमाचे काम तसेच तुमचा आवडता खेळ आणि व्यायाम सुद्धा करू शकता.
थोडक्यात
'कुलटच' लेसरच का ?
१. एंडोव्हीनस मधील सर्वात आरामदायी लेसर
२. त्रासापासून त्वरित आराम
३. पूर्ण भुलेची गरज नाही.
४. व्रण विरहित.
५. यशाची जवळजवळ ९५ टक्के खात्री.
६. कामाचा कमीत कमी खोळंबा.