'प्लास्टिक सर्जरी'
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो.
गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
ज्यांच्या शरीरात किलॉइडची प्रवृत्ती असते अशा रुग्णांना कापले अथवा खरचटले तरी ती जखम भरल्यानंतर तयार होणाऱ्या व्रणांचे किलॉइडमध्ये रूपांतर होऊ शकते. अशी हि प्रवृत्ती अनुवंशिकही असू शकते व पौगंडावस्थेत जास्त असू शकते. काही वेळा साध्या पुटकुळीचे रूपांतर सुद्धा किलॉइड मध्ये होऊ शकते कारण त्वचेतील ती एक लहानशी जखमच असते .
किलॉइडची गाठ ऑपरेशन ने काढावयास सोपी वाटत असली तरी तसे करू नये. तसे केल्यास (गाठ काढून टाकल्यास) त्याची वाढ झपाट्याने व पहिल्यापेक्षा दुपटीने होऊ शकते. हि गाठ वाढत असल्यामुळे त्याची वाढ कमी करणे किंवा थोपविणे हा एकच उपाय राहतो.
शरीरात कुठल्याही ठिकाणी कापले तर जखम भरून येण्यासाठी कोलॅजेन तयार होते व जखम भरल्यानंतर कोलॅजेन तयार होणे थांबते. परंतु ज्यांच्या शरीरात किलॉइडची प्रवृत्ती असल्यामुळे जखम भरल्यानंतरही कोलॅजेन व्रणात भरणे बंद होत नाही व तो व्रण फुगत जाऊन पसरतो व मोठा होत राहतो. काही लोकांना इंजेकशन दिलेल्या जागी व कुठल्याही आजारासाठी कराव्या लागलेल्या ऑपरेशनच्या टाके घातलेल्या ठिकाणी जाड व्रण तयार होतो काही दिवसानंतर अश्या गाठीत आग होणे, खाजवणे किंवा ठसठसणे असा त्रास चालू होतो व केसाळ भागावर केस आत मध्ये रुतून तिथे इन्फेकशन होण्याची शक्यता असते.
किलॉइडची गाठ ही श्यकतो छाती, कान, दंड , हात या भागावर होतात. अशा गाठीत सहसा इंजेकशन, विशिष्ट प्रकारचे औषध वापरून मसाज , सिलिकॉन जेल शीट, बाहेरून प्रेशर देणे अशा पद्धती उपचारासाठी वापरतात. या उपचारासोबत सध्या लेसर उपचार केले जातात. लेसर उपचारानेसुद्धा बराच फायदा मिळतो. गाठीत इंजेक्शन देण्याचीसुद्धा एक विशिष्ट पद्धत असते इंजेक्शन दिले तर किलॉइडची गाठ मऊ होते व खाज बंद होऊन गाठीची वाढ थांबते. परंतु त्या गाठीत एक महिन्याच्या अंतराने पुन्हा इंजेक्शन घ्यावे लागते.
किलॉइडची गाठ कमी करण्यासाठी महिन्यातून एकदा लेसर उपचार घ्यावा लागतो. लेसर उपचाराने किलॉइडची वाढ कमी होते परंतु किलॉइड असलेल्या ठिकाणची त्वचा पूर्ववत कधीच होत नाही याची नोंद घ्यावी.
किलॉइडच्या गाठीत इंजेक्शन देणे किंवा लेसर उपचार घेणे या उपचारपद्धती किलॉइडची वाढ कमी करण्यास मदत करतात पूर्ण बरे होण्यासाठी नाही याची नोंद घ्यावी.
इंजेक्शनचे प्रमाण ठरलेले असते अधिक प्रमाणात इंजेक्शन दिले तर त्या गाठीच्या ठिकाणी खड्डा पडू शकतो.
किलॉइडसाठी लेसर उपचार घेतल्या नंतर कोणत्या रुग्णांना किती फरक जाणवेल व किती वेळा लेसर उपचार घ्यावा लागेल हे सांगता येत नाही. कारण प्रत्येकाला उपचाराचा लाभ वेगवेगळ्या पद्धतीने मिळत असतो.
किलॉइडच्या बाबतीत पूर्ण बरे होणे हे सध्या उपलब्ध उपचार पद्धतींनी शक्य नाही याची नोंद घ्यावी