' सौंदर्यवर्धक सर्जरी '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
गालावरील खळी आणि चेहर्यावरील लहान पण गडद तीळ सौंदर्य हमखास खुलवितात. असे नैसर्गिक वरदान लाभलेल्यांचा हेवा करण्याची आता गरज नाही. गालावर हवी तशी खळी आणि चेहऱ्यावर छान दिसेल असा ' नॅचरल ब्युटी स्पॉट ' देऊन आम्ही आपली ' स्माईल व्हॅल्यू ' वाढवण्यास मदत करतो .
गालावरील खळी
फर्स्ट इम्प्रेशन इस द लास्ट इम्प्रेशन असं जरी म्हंटल असलं तरी ते पूर्ण सत्य आहे असं नाही कारण आता आपण आपले व्यक्तिमत्व सकारात्मक आणि लूक मध्ये आकर्षक बदल करून इतरांवर प्रभाव पाडू शकता प्रत्येकालाच वाटत असत कि आपण चांगलं दिसावं, चारचौघात आपली छाप पडावी आणि असं वाटण म्हणजे काही नखरेलपणा नव्हे मी तर असं म्हणेन कि सुंदर दिसावंस वाटण हि प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक व सहज अशी मानसिकता आहे. किंबहुना एखाद्याला तसे न वाटणे हेच मुळी अँबनॉर्मल आहे.
सुंदरतेचे मापदंड स्थळ सापेक्ष आणि काल सापेक्ष असल्याने जरी बदलत असले तरी प्रत्येकाच्या मनात त्यातील सर्वोत्कृष्ट गुणांनी परिपूर्ण अशा चेहऱ्याची आणि शरीराची प्रतिमा वसलेली असते. ती व्यक्ती तिच्या नकळत अशा फीचर्सकडे आकर्षली जाते बऱ्याच तरुणांना आपल्या आवडत्या दीपिका पदुकोण, शाहरुख किंवा प्रीती झिंटा या कलाकारांसारखी मोहक दिसणारी गालावरील खळी भुरळ घालत असते, अशीच खाली आपल्या गालावर असती तर ? असा प्रश्न त्यानां नेहमीच पडतो.
आशिया खंडाच्या बऱ्याच देशाच्या लोकसाहित्यात एखाद्याच्या गालावर खळी असणे हे बलवत्तर नशीब आणि चांगल्या प्रजनन क्षमतेचे द्योतक मानले गेले आहे. पाश्चिमात्य मात्र त्याकडे फक्त एक असामान्य आणि मोहक असे चेहऱ्याचे वैशिष्ट्य म्हणूनच पाहतात. आशियाई जमातीमध्ये नैसर्गिक खळी असण्याचे प्रमाण जरी इतरांएवढेच असले तरी खळी बनवून घेण्याकडे मात्र त्यांचा कल अधिक आढळतो आणि त्यामागे वर उल्लेखिलेला लोकसाहित्याचा समाजमनावरील पगडा व अंतर्मनातील सुंदर चेहऱ्याची छबी हि दोन कारणे असू शकतात.
निसर्गतः ज्यांच्या गालावर खळी पडते अशा गालांचा शारीत्रशास्त्रानुसार अभ्यास केला असता असे लक्षात आले आहे कि त्यांच्या गालातील बक्सीनेटर नावाच्या स्नायूत फट असते आणि तो वरील त्वचेला चिकटलेला असतो त्यामुळे जेव्हा जेव्हा तो आकुंचन पावतो तेव्हा तेव्हा त्वचा आतील फटीत खेचली जाऊन तिथे छोटा खड्डा पडतो म्हणजेच खळी उमटते.
डिंपल क्रेयेशन मध्ये आम्ही निसर्गाच्या या करामतीचे अनुकरण करतो.
खळी पाडण्याच्या या छोट्या शस्त्रक्रियेत गालात असणाऱ्या हास्यस्नायूंशी वरच्या त्वचेचा काही भाग शिवून टाकला जातो त्यामुळे गालावर विशिष्ट ठिकाणी खळी तयार होते . तासाभरात होणारी हि शस्त्रक्रिया तेवढीच जागा बधिर केल्यामुळे वेदनारहीत असते. गोबऱ्या गालांवरसुद्धा खळी तयार करता येत असली तरी ती जास्त जाड नसलेल्या गालावर करणे सोपे जाते व छानही दिसते.
लक्ष्यवेधी खळ्यांची जागा जरी गालावर स्माईल घडीच्या बाजूला ठरलेली असली तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्याला साजेल अशी जागा आणि तिचा आकार हा कॉस्मेटीक सर्जन तुमच्याशी चर्चा करून ठरवत असतात. फार वरती, फार खाली, फार बाजूला तसेच फारच लहान किंवा फार लांब खळी एखाद्याच्या चेहऱ्याला उठाव देईलच असे नाही म्हणून या सर्जरीत माझ्या मते खळीच्या लोकेशनला असाधारण असे महत्व असून त्यासाठी क्लायंट व सर्जन दोघांनाही पुरेसा वेळ खर्ची घालावा असे सुचवावेसे वाटते.
कॉस्मेटिक सर्जरीने फक्त रूपच बदलत नसून त्या व्यक्तीची आपली सेल्फ इमेज म्हणजेच स्वप्रतिमेवरील आत्मविश्वास दृढ होतो आणि त्याची संपूर्ण ' पर्सनॅलिटीचं ' बदलते. अशी व्यक्ती एका नव्या उमेदीने समाजात वावरून नवनवीन ध्येय प्राप्त करू शकते.