' लेसर उपचार '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
त्वचा हे बाह्य आवरण असल्याने प्रथमदर्शनी चटकन नजरेत भरते. नितळ त्वचा म्हणजे जिच्यावर पिंपल्स, खड्डे, ओपन पोअर्स, ब्लॅक आणि व्हाईट हेडस, व्रण किंवा एकही डाग नाही अशी स्मूथ स्किन. मग ती कोणत्याही रंगाची असली तरी छानच दिसते. जर ती तशी नसेल, तर मात्र आता निरनिराळ्या लेसरच्या माध्यमातून तिला नितळ आणि तजेलदार करता येते. पिंपल्सच्या खड्ड्यांसाठी आजतागायत विनाशस्त्रक्रिया परिणामकारक असा उपचार नव्हता. परंतु सीओटू लेसरमधील 'फ्रॅक्शनेशन' तंत्राच्या शोधामुळे आता ते शक्य झाले आहे . फ्रॅक्शनेशन म्हणजे विभागणे . यात सीओटू लेसरचा बीम केसांपेक्षाही बारीक अशा शेकडो सूक्ष्म किरणांत विभागला जातो. स्कॅनरच्या सहाय्याने त्यांची संख्या आणि त्वचेत उतरण्याची खोली ठरवता येते. एका चौरस सेंटीमीटर मध्ये असे २४ पासून ६१८ सूक्ष्म किरण घेऊन खोल खड्ड्यांसाठी मध्यापर्यंत आणि ओपन पोअर्ससाठी त्वचेच्या वरच्या थरापर्यंत पोहोचणारी सूक्ष्मतम छिद्रे पाडली जातात. या छिद्रांना त्वचेतील सूक्ष्म जखमा समजून त्या भरण्याची नैसर्गिक प्रक्रिया शरीराकडून लगेचच सुरु होते या प्रक्रियेत अंत:त्वचेच्या थरात कोलॅजनची निर्मिती झाल्याने प्रत्येक ट्रीटमेंट नंतर खड्ड्यांची तीव्रता कमी कमी होत जाऊन खड्डे आणि व्रण पुसटसे होतात तसेच त्वचेचा खरबरीतपणा कमी होऊन ओपन पोअर्स नाहीशी होऊन त्वचा नितळ आणि स्मूथ होते.
गोजिरवाने रूप साजरे असेल तर आयुष्य सुखात व्यतीत होते. गोजिरवाणे रुप म्हणजे नाकी, डोळे छान, बांधा सुडौल, तेजस्वी कांती, नितळ त्वचा अशी व्याख्या केली जाते. सुंदर रूप असेल परंतु त्याला जर मोड्यांचा त्रास असेल तर गोजिरवाणे रूप सुद्धा नकोसे वाटते. भरीस भर म्हणून जर चेहऱ्यावर मोड्यांचे व्रण किंवा खड्डे असतील तर उत्साह हिरमुसतो. पण आपला हिरमुसलेपणा घालवा फक्त फ्रॅक्शनल सी ओ टू लेसरने म्हणजेच मोडयांच्या व्रणावर व खड्ड्यावर प्रभावी लेसर उपचार.
मोडयांच्या खड्ड्यामुळे चेहरा अगदी रखरखीत दिसतो व व्यक्तिमत्वात बराच फरक पडतो. आपण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी नानाविध उपाय करत असतो. खरं म्हणजे चेहऱ्याचं सौंदर्य हे त्वचेवर अवलंबून असत. स्त्रिया, मुली, मुले व पुरुष यांना चेहऱ्यावर मुरूम आले तर त्वचा तेलकट आहे हे बहुतांश जणांना माहित असते परंतु अशा त्वचेची काळजी कशी घ्यायची यावर केली जाणारी चर्चा इतकी परस्परविरोधी असते कि, सामान्यजणांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ उडतो. म्हणून आपण त्वचेला तेलकटपणा का येतो याविषयी जाणून घेऊ.
साधारणतः तरुण वयोगटातील (१४ ते २२) मुलामुलींची त्वचा जास्त तेलकट असते या वयात आपल्याला निसर्गाची खूपच साथ असते. शरीरात सुद्धा खूपच बदल घडत असतात शरीरातील तैलग्रंथी सुद्धा या बदलामुळे उत्तेजित होत असते. या तैलग्रंथी उत्तेजित झाल्यामुळे त्यातून जरुरीपेक्षा जास्त तेल निर्माण होते हे जास्त निर्माण झालेलं तेल त्वचेबाहेर पडत आणि त्वचेवर तेलकटपणा दिसू लागतो हि सर्व क्रिया हार्मोनच्या बदलामुळे होत असतात.
आपली त्वचा तेलकट आहे हे समजून घेणेसाठी एक सोपा उपाय आहे. रात्री झोपताना आपला चेहरा पूर्ण कोरडा करून घ्या व सकाळी उठून टिश्शू पेपर ने आपला चेहरा स्वच्छ पुसून काढावा जर त्वचा तेलकट असेल तर टिश्शू पेपर तेलकट होतो. जर आपला चेहरा तेलकट असेल तर तो वरचेवर साबणाने धुवावा व कोरडा कसा राहील याकडे लक्ष्य ठेवावे. कारण अश्या त्वचेवर मोडींचा त्रास होणे स्वाभाविक आहे. मोड्यांचा त्रास जर वरचेवर होत असेल तर यावर वेळीच उपाय करावा. त्वचेतील तेलकटपणा कमी करण्यासाठी लेसर उपचार आहे.
फ्रॅक्शनल सी ओ टू लेसर हि आधुनिक लेसर प्रणाली आपणास चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी खूपच लाभदायी आहे. उपचाराचा वाढीच्या साधारण १ तास असून त्यासाठी १ ते ४ वेळा उपचार घ्यावा लागतो .
चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी आपल्याकडे अनेक उपचार पद्धती आहेत पैकी मायक्रोडर्माब्रेजन, डरमा रोलर, फ्रॅक्शनल सी ओ टू लेसर यापैकी डरमा रोलर, फ्रॅक्शनल सी ओ टू लेसर उपचार अत्यंत उपयुक्त आहे.