' लेसर उपचार '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
बाह्य त्वचेतील ल्हासे हे सहसा फिकट किंवा गडद तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांच्या कडा आखल्यासारख्या स्पष्ट ओळखता येतात. आंतरत्वचेतील ल्हासे काळपट किंवा निळसर हिरवट असतात आणि ते कडेला अस्पष्ट होत जातात. तिळाचा किंवा ल्हाश्याचा गडदपणा हा त्यातील रंग-द्रव्याच्या घनतेवर अवलंबून असतो. तसेच काही ल्हाशांवर जन्मतःच केस असतात तर काहींवर ते पौगंडावस्थेत येतात. ल्हाशांना पूर्वी इलाज नसल्याने जन्मखूण म्हणून ते जन्मभर अंगावर वागवले जात असत. फक्त रंग गडद आहे म्हणून प्लास्टिक सर्जरीने ल्हाश्याच्या ठिकाणची त्वचा बदलणे म्हणजे त्वचेवर अन्याय करण्यासाखे आहे आणि तसे केले तरी ते त्वचेला ठिगळ लावल्यासारखे दिसते. न पसरणारा ल्हासा जरी म्हंटल, तरी तो जीवंत पेशींनी बनलेला असतो. त्वचेत इतरत्र होते तशी पेशींची उलाढाल तेथेही सतत सुरु असते. आय पी एल, 'क्यू-स्विच्ड' लेसर किंवा फ्रॅक्शनल सीओटू लेसरने असे ल्हासे त्वचेला कोणतीही इजा न करता किंवा मागे कोणताही डाग राहू न देता कांही सिटिंग्जमध्ये कायमचे काढता येतात. चेहऱ्यावर डोळ्याभोवतालचा भाग व्यापणारा आणि त्वचेत सर्वात खोलवर असलेला हिरवट काळा 'निव्ह्स ऑफ ओटा' साठी तर या 'क्यू-स्विच्ड' लेसरला पर्याय नाही. त्याचप्रमाणे टीन एजर्स मध्ये खांद्याच्या मागे-पुढे दिसणारा 'बेकर' चा ल्हासा आणि अगदी फिक्कट तपकिरी 'कॅफे ओ ले म्यॅकुल' सुद्धा या लेसरनी काढले जातात.