'प्लास्टिक सर्जरी'
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो.
गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव असून पंचमहाभूतां-पासून शरीरांतर्गत अवयवांचे रक्षण करण्याचे काम ती करत असते. बाह्य आणि अंतः त्वचा असे त्वचेचे दोन भाग असतात. बाह्य त्वचेचा थर हा अतिशय पातळ असून त्यातील मेलॅनिनमुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. आणि त्यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांना थोपवून अंतःत्वचेचे रक्षण केले जाते. बाह्य त्वचेच्या तुलनेत अंतःत्वचा २० पटीने जाड असते. बाह्यत्वचा आणि अंतःत्वचा तिच्या खालच्या थरापर्यत जरी निघून गेली तरी अशा जखम खाली उरलेल्या थरापासून काही दिवसात लवकर भरून येते. परंतु पूर्ण जाडीची त्वचा जर निघून गेली तर मात्र अशी जखम तिच्याकडे कडेने हळूहळू भरत असल्याने ती भरण्यास बऱ्याच दिवसांचा अवधी लागतो. त्वचा हे शरीराचे संरक्षक कवच असल्याने ते नष्ट झाल्याने जंतूचा प्रादुर्भाव होण्याची दात शक्यता या असते आणि जर हे विस्तृत प्रमाणावर झाले असेल तर ते जीवघेणेही ठरू शकते. भाजलेले रुग्ण दगावण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. यावर उपाय म्हणू 'स्किन ग्राफ्टिंग' किंवा 'त्वचारोपण' शस्त्रक्रिया केली जाते. यात बाह्य आणि अंतः त्वचेचे अगदी वरवरचे थर स्किन ग्राफ्टिंग नाइफने किंवा डर्माटोन यंत्राने एखाद्या कागदासारखे उचलले जातात. जखमेवर रोपण केलेली त्वचा आठवड्याभरात रुजू होऊन तिथे कायमची राहते. जिथून ती काढली जाते तिथे अंतःत्वचेचे बहुतांशी थर शिल्लक असल्याने थेतील खरचटल्यासारखी जखम आठवड्याच्या आत खालून भरून येते . सहसा मंडी किंवा शरीराच्या झाकलेल्या भागावरून ती काढली जात असल्याने, तेथे दिसणाऱ्या पुसटशा व्रणाबद्दल रुग्णांची तक्रार नसते. स्किन ग्राफ्टिंग हे प्लास्टिक सर्जरीमध्ये वारंवार केले जाणारे ऑपरेशन असल्याने समाजामध्ये प्लास्टिक सर्जरी म्हणजे फक्त त्वचारोपण शस्त्रक्रिया असे काहीसे चुकीचे समीकरण झालेले दिसते