' सौंदर्यवर्धक सर्जरी '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
ओघळलेल्या स्थनांना सर्जेरीने उचलून घेऊन पुष्ट करून त्यांना उभारी देता येते. जर आकार मोठा हवा असल्यास त्याच वेळी ' ब्रेस्ट इम्प्लांट ' वापरून तो वाढवला येतो.
ब्रेस्ट एन्लार्जमेन्ट (स्तनवृद्धी) : अपेक्षेपेक्षा स्तन लहान असेल तर स्त्रियांचे मन कमतरतेच्या भावनेने खच्ची होते. ब्रेस्ट इम्प्लांट सर्जेरीच्या रूपाने त्यांच्या आशा पुनः पल्लवित होऊ शकतात, कारण हा पर्याय फक्त खात्रीशीरच नाही तर पूर्णपणे सुरक्षित आहे ब्रेस्ट इम्प्लांटस् हे अति उच्चप्रतीच्या मेडिकल ग्रेड सिलिकॉनच्या आवरणात सिलिकॉन जेलीने भरलेले अगदी हलके अर्धगोलाकार आकाराचे फुगे असतात. स्तनांच्या खालील घडीत घेतलेल्या दोन इंचांच्या छोट्या छेदातून नैसर्गिक स्तन आहेत तसे पुढे उचलून त्यांच्या मागे हे इम्प्लांट चपलखपणे बसविले जातात, त्यामुळे भविष्यात स्तनपान देण्यात कोणतीही अडचण निर्माण होत नसल्याने अविवाहित मुली सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. दिसायला आणि स्पर्शाला असे उन्नत उरोज स्त्रीच्या फक्त मनालाच नाही तर तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्वालासुद्धा एक नवीन उभारी देऊन तिचे उर्वरित जीवन परिपूर्ण करतात .