' सौंदर्यवर्धक सर्जरी '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
पुरुषांच्या स्थनग्रंथी जन्मभर सुप्तावस्थेत असतात. त्यांना काही काळासाठी का असेना, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या स्त्री हार्मोनकडून उत्तेजन मिळाले तर त्यांची वाढ होऊ शकते आणि काही मुलांच्या आणि पुरुषांच्या बाबतीत हेच घडते. वाढलेल्या स्तनांच्या आकारानुसार गायनिकोमॅस्टियाच्या चार ग्रेड्स ठरतात पहिल्या ग्रेडची वाढ बनियन काढल्याखेरीज जाणवत नाही, तर चौथ्या ग्रेडच्या ब्रेस्ट असलेली मूळ बनियन काढायचं तर सोडाच पण साधा शर्टसुद्धा बाथरूमच्या बाहेर काढत नाहीत. पूर्वी छातीवर मोठे छेद घेऊन वाढलेल्या ब्रेस्ट ऑपरेशनने काढल्या जायच्या. पूर्ण भुलेची जोखीम, रक्तस्त्राव जास्त दुखणे आणि बरे होण्यासाठी लागणार प्रदीर्घ कालावधी तसेच मागे राहणारे व्रण हे त्याचे तोटे होते.या सर्वावर मात म्हणून आता लायपोसक्शन तंत्राने चार मि. मी. च्या छोट्या छेदातून या वाढलेल्या ब्रेस्टस सहजगत्या काढता येतात. संध्याकाळी परत जायची सुविधा, कमी दुखणे आणि व्रण न राहणे या जमेच्या बाजू. पूर्वी छेद ब्रेस्ट खालच्या घडीत घेतला जायचा त्यामुळे लहानशी का असेना व्रणाची एक रेष मागे रहायची. लायपोसक्शन तंत्रातील नवीन सुधारणेनुसार आता हा व्रण लपविणे आम्हाला शक्य झाले आहे आणि म्हणूनच याला ' डागविरहित लायपोसक्शन' म्हणतात