' लेसर उपचार '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
हिमांजिओमा म्हणजे लहान मुलांच्या त्वचेवर उठणारी रक्तवाहिन्यांची लाल मऊ गाठ. जन्मानंतर पहिल्या काही दिवसात किंवा आठवड्यातच ती दिसू लागते. डांस चावल्यामुळे गांधी उठली असेल म्हणून सुरुवातीला तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते. वरकरणी जरी या गाठी साध्या वाटत असल्या, तरी पाच कारणांनी त्या त्रासदायक ठरू शकतात.
1. पहिले म्हणजे चेहरा किंवा उघड्या भागावर असल्यास त्या सौंदर्याच्या आड येतात.
2. दुसरे म्हणजे जर त्या डोके, पाय, पाठ, अशा वारंवार घासल्या जाणाऱ्या भागावर असतील तर मार लागल्याने त्यातून भळभळ रक्त वाहू शकते.
3. तिसरे म्हणजे पापण्यांवरील हिमांजिओमाने डोळा बंद झाल्यास डोळ्याची वाढ कायमची खुंटून डोळा लहान राहू शकतो. अशा वेळी उपचार तातडीने करावे लागतात.
3. तिसरे म्हणजे पापण्यांवरील हिमांजिओमाने डोळा बंद झाल्यास डोळ्याची वाढ कायमची खुंटून डोळा लहान राहू शकतो. अशा वेळी मात्र उपचार तातडीने करावे लागतात.
4. चौथे म्हणजे यातील काही गाठी इतक्या भरभर वाढतात, कि चेहऱ्याचा निम्मा भाग व्यापून टाकतात. भरभर वाढीमूळे त्यांवर जखमा होतात आणि त्या लवकर भरत नाहीत. कांही वेळेला अशा जखमांमुळे चेहऱ्याचा एखादा महत्वाचा भाग कायमचा नष्ट होऊन त्या बाळाला कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते.
5. पाचवे आणि मह्त्वाचे कारण म्हणजे सुरुवातीला कोणती गाठ किती मोठी होणार आणि ती कशी पसरणार, हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे उपचार लवकर सुरु केलेले कधीही चांगले.
पूर्वी हिमांजिओमासाठी परिणामकारक असा उपचार नव्हता, म्हणून डॉक्टरांकडून सुद्धा 'थांबा आणि पहा' असा सल्ला दिला जायचा. लक्षकिरणांतील प्रगतीमुळे आता एनडीयाग लेसर यावर अतिशय प्रभावी ठरले असून ते गाठीतील रक्तवाहिन्या बंद करते. त्यामुळे हिमांजिओमाच्या गाठींची वाढ लगेच थांबते. प्रत्येक लेसर उपचारागणिक त्यांचा आकार कमी होत जाऊन त्या पूर्णपणे निघून जातात तेही कसलाही व्रण अथवा डाग मागे न ठेवता …!