' सौंदर्यवर्धक सर्जरी '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
चेहऱ्याचे सौंदर्य हे त्यातील अवयवांचा उठावदारपणा, त्याची एकमेकांशी असलेली प्रमाणबद्धता आणि उंच सखल भाग एकमेकात बेमालूमपणे कसे मिसळलेले आहेत यावर बहुतांशी अवलंबून असते. सौंदर्याचे मापदंड जरी स्थळ, काळ आणि संस्कृतीनुसार बदलत असले, तरी कॉस्मेटिक सर्जन हे सौंदर्याच्या प्रचलित मापदंडानुसार चेहऱ्याचा अभ्यास आणि विश्लेषण करून त्यात सुधारणा सुचवतात.
1. सिलिकॉन इम्प्लांट : उठाव कमी असलेल्या भागांना सिलिकॉन इम्प्लांट वापरून आकर्षक केले जातात. यामध्ये नाकाची दांडी सरळ बाणेदार करून उचलण्यासाठी 'J ' आकाराचा सिलिकॉन ' नोज इम्प्लांट ' आणि बसक्या गालांच्या हाडावर चपलखपणे बसून त्यांना उठाव देणारी 'चिक इम्प्लांट्स' वापरली जातात.
2. मागे असलेली जीवनी फक्त चेहऱ्यालाच न्हवे तर एकंदरीत व्यक्तिमत्वालाच बाधा पोहोचवते. जीवनीला मध्यभागी उठाव देण्यासाठी ' सेंट्रल चिन इम्प्लांट ' आणि ती उठावदार आणि उंच करण्यासाठी 'एक्स्टेंडेड चिन इम्प्लांट' वापरले जातात.हनुवटीवर खळी पाहिजे असल्यास ती सुद्धा देता येते.
3. आत ओढलेले गाळ चरबीच्या कमतरतेमुळे कृष दिसतात आणि त्यांना तुमच्या शरीरातील चरबी वापरून छान केले जाते. याउलट अतिरिक्त चरबी संचयामुळे झालेले गुबगुबीत गाल मात्र प्रौढांच्या चेहऱ्याला अपरिपक्वतेची झाक देतात. सध्याच्या 'झिरो फिगर' ट्रेंडमध्ये तर नकळत आत गेलेले गालच वरच्या हाडांना उठाव देत असल्याने आकर्षक समजले जातात. गालंच्या आतून केल्या जाणाऱ्या एका छोट्या शस्त्रक्रियेने हे ' बेबी फॅट ' काढून टाकल्याने चेहऱ्यावर परिपक्वता परत दिसू लागते.