"लक्ष्यकिरण" हे भारतातील एक अग्रगण्य आणि पूर्ण विकसित कॉस्मेटिक आणि लेसर सर्जरी सेंटर आहे जे जगातील सर्वोत्तम अशा अकरा लेसर सिस्टम्सनी सुसज्ज आहे. सेंटरच्या मुख्य प्लास्टिक सर्जनना 34 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.तसेच हे सेंटर ISO 9001: 2008 प्रमाणित आहे.आपल्या सर्व कॉस्मेटिक आणि लेसर विषयक गरजांचे समाधान एकाच छताखाली उपलब्ध करून देत असून आम्हीे या " सौंदर्य जगात " आपले स्वागत करत आहोत.










आमच्याविषयी

       आयएसओ 9001: 2008 मानांकित या क्षेत्रातील प्रथम कॉस्मेटिक लेझर केंद्र आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणासह अत्यंत योग्य आणि वचनबद्ध वैद्यकीय व्यावसायिकांच्या पथकाद्वारे जागतिक दर्जाचे सर्वसमावेशक, काळजी घेणारे आणि खर्च प्रभावी वैद्यकीय उपचार प्रदान करते


आमची लेसर प्रणाली

लक्ष्यकिरण हे कॉस्मेटिक आणि लेझर ट्रीटमेंट्स, प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक प्रक्रियेचे केंद्र आहे. जागतिक दर्जाच्या अकरा लेसर मशिन्सवर उपचार घेऊन महाराष्ट्र , कर्नाटक आणि गोव्यातील हजारो स्त्री - पुरुष अनुभवत आहेत . . . . . . . . . . . . . मुक्त हास्य .

डॉक्टरांच्या बद्दल

      आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्ये त्यांनी अनेक वैज्ञानिक शोधनिबंधांचे योगदान दिले आहे आणि कॉस्मेटिक आणि लेझर शस्त्रक्रियेच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि जागतिक कॉंग्रेसमध्ये नियमितपणे अध्यापक म्हणून भाग घेतला आहे.

प्रेस रिलीज

डॉक्टर उद्धव पाटील यांचे लेख दैनिक वर्तमान पत्रामध्ये तसेच 'वैज्ञानिक' नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत .





सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया

             कॉस्मेटिक सर्जनकडे अभिजात सौंदर्यदृष्टी आणि शरीर आकृतीबंधाचे त्रिमितीय भान असते तसेच त्यात वयपरत्वे होणाऱ्या किंवा कॉस्मेटिक सर्जरीने होऊ घातलेल्या बदलांचे आजमितीला आकलन करण्याची क्षमता असते. अनेक लोकांना त्यांचे रूप त्यांच्या मनात असणाऱ्या स्व-प्रतिमेतील रूपाशी सुसंगत वाटत नाही अशा लोकांच्या बाबतीत जे निसर्गतः आहे त्यात सुधारणा करून आकार देऊन किंवा भर घालून त्या व्यक्तीचे शरीर किंवा चेहरा सुंदर केला जातो यालाच 'कॉस्मेटिक सर्जरी' असे म्हणतात.




लायपोसक्शन

अतिरिक्त चरबी काढून बांधा सुडौल करा. .

ब्रेस्ट रिडक्शन

स्तनांचा आकार कमी करणे             (स्त्रि / पुरुष )

फेशिअल इम्प्लांट

चित्तवेधक चेहऱ्यासाठी फेशिअल इम्प्लांटस् !

डिंपल क्रिएशन

गालावरील खळीने " स्माईल व्हॅल्यू " वाढवा




सौंदर्यवर्धक प्रक्रिया

कॉस्मेटिक प्रक्रिया प्रामुख्याने कॉस्मेटिक शस्त्रक्रियांपेक्षा भिन्न आहेत ज्यामध्ये कोणतीही शस्त्रक्रिया गुंतलेली नाही. सहसा या डे केअर किंवा लंच टाइम ऑफिस प्रक्रिया असतात. अधिक आक्रमण करणारी कॉस्मेटिक सर्जिकल उपचारांसह आवश्यक असणारी गुंतागुंत किंवा पुनर्प्राप्ती वेळेचा धोका न घेता ज्या रुग्णांना त्यांचे स्वरूप सुधारण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नॉन-आक्रमक कॉस्मेटिक प्रक्रिया आवाहन करतात. याची प्रमुख कारणे म्हणजे परवडणारी क्षमता, खूप कमी किंवा नाही डाउनटाइम आणि कमी गुंतागुंत.






चेहऱ्यावरील सुरकुत्या



लेसर उपचार

दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असं कितीही म्हणलं तरी आज असण्याच्या बरोबरीने दिसण्यालाही महत्व प्राप्त झाले आहे हे निर्विवाद ! सुंदर दिसणे म्हणजे नटणे-सवरणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नसून, चेहऱ्यासह संपूर्ण शरीराच्या सौंदर्यालाच आज काल महत्व प्राप्त झाले आहे. लेसर आणि कॉस्मेटिक सर्जरीने सौंदर्यवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ' लेसर उपचार ' लेसर म्हणजे एकच तरंगलांबी असलेल्या किरणांचा प्रखर झोत. शरीरांतर्गत आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेताना बाजूच्या पेशींना इजा न पोहोचवता कार्यभाग साधणाऱ्या या निखळ किरणांना 'लक्षकिरण' हेच नाव सार्थ ठरलं आहे. या लक्षकिरणांनी विविध उपचार करता येतात.

अनावश्यक केस

अतिरिक्त चरबी काढून टाकण्याचे तंत्र .

हिमांजिओमा

(रक्तवाहिन्यांची जाळी )

तारुण्यपिटिका

पिंपल्सचे खड्डे आणि व्रणांसाठी लेसर

तीळ

(तीळ, ल्हासे आणि जन्मखूणा)

गोंदण

क्षणिक भावनावेगाची कायमची स्मुती !




प्लॅस्टिक सर्जरी

        प्लास्टिक सर्जरीमधील प्लास्टिक हे विशेषण मूळ ग्रीक शब्द ‘प्लास्टिकॉस’ या शब्दापासून आले आहे. त्याचा अर्थ घडवणे, आकार देणे किंवा पुनर्रचना करणे असा आहे. प्लास्टिक सर्जरी किंवा सुघटन शल्यचिकित्सा म्हणजे केवळ कॉस्मेटिक सर्जरी किंवा सौंदर्यवर्धक शल्यचिकित्सा नसून त्यात शरीरातील आनुवंशिक त्रुटी ठीक करणे, अपघाताने तुटलेली बोटे, हात, पाय जोडणे, कर्करोग झालेले अवयव काढून त्यांचे सुघटन करणे, भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणे, त्वचारोपण, अवयवांचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करणे आणि त्यांचा आकार सुधारणे, दुर्बिणीद्वारे रक्तवाहिन्या आणि नसा जोडून शरीरातील एका भागातील त्वचा, मांस, हाड किंवा चरबी दुसऱ्या भागावर स्थलांतरित करणे इत्यादींचा समावेश असतो.