लक्ष्यकिरण
कॉस्मेटिक लेसर सेंटर
लक्ष्यकिरण कॉस्मेटिक लेसर सेंटर

लक्ष्यकिरण कॉस्मेटिक लेसर सेंटर हे आयएसओ 9001: 2008 या मानांकनाने प्रमाणित केलेले महाराष्ट्राच्या पश्चिम-दक्षिण विभागातील पहिले कॉस्मेटिक लेसर सेंटर आहे.

आयएसओ 9001: 2008 विषयी
               आयएसओ म्हणजे 'इंटरनॅशनल स्टॅण्डर्स ऑर्गनायझेशन'. हि एक जागतिक स्तरावरील संस्था असून ती निरनिराळ्या सेवा, संस्था, संघटनांसाठी आंतरराष्ट्रीय मानांकने तयार करून वितरित करत असते आणि कालानुरूप त्यात सुधारणाही करत असते.
                आयएसओ 9001: 2008 मानांकन मिळविण्यासाठी एखाद्या संस्थेला प्रथम आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. त्यासाठी संस्थेला कांही खास मापदंड स्वतःच तयार करावे लागतात. उदाहरणच द्यायचे झाल्यास त्या संस्थेला प्रथम हे दाखवून द्यावे लागते कि ते ग्राहकांच्या गरजांनुसार उपचार आणि सेवा नियमितपणे देऊ शकतात आणि तेही संबंधित सर्व नियमांचे काटेकोररित्या पालन करून. हे पाहत असताना ग्राहकांच्या समाधानाला प्रथम प्राध्यान्य दिले जाते. एवढेच करून भागत नाही तर आयएसओ 9001: 2008 मानांकन टिकविण्यासाठी या सेवांमध्ये नियमितपणे सुधारणा होत गेली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी बनविलेल्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचा त्यांनी परिणामकारक वापर केला पाहिजे. या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीमध्ये सुद्धा ग्राहकांच्या गरजांचा आणि इतर अनुषंगिक गोष्टींचा समावेश करून त्यात सुधारणा करत गेले पाहिजे. ज्या संस्था या सर्व बाबींचे तंतोतंत पालन करतात त्यांनाच हे आयएसओ मानांकन मिळते. लक्षकिरण लेसर सेंटरने आपली स्वतःची गुणवत्ता व्यवस्थापन कार्यप्रणाली तयार करून त्याद्वारे आपल्या ग्राहकांना पूर्ण समाधान प्रदान केले आहे.
लक्ष्यकिरण कॉस्मेटिक लेसर सेंटरचे व्हिजन आणि मिशन
                अतिउच्च शिक्षित आणि वचनबद्ध वैद्यकीय व्यावसायिकांच्या पथकाद्वारे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा एकत्रित आणि काळजीपूर्वक तेही कमीतकमी खर्चात पुरविणे.
व्यवसायातील नैतिकता पाळून आणि नफ्याला मुख्य उद्दिष्ट न बनविता ते एक उप-उत्पादन आहे असे मानून आरोग्यसेवा पुरविणे.
समाजातील वंचितांना मोफत किंवा अत्यल्प दरात वैद्यकीय उपचार देऊन सामाजिक जबाबदारी पूर्ण करणे.
क्वालिटी पॉलिसी
                आम्ही “लक्ष्यकिरण लेसर सेन्टर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट" मध्ये वैयक्तिक बांधिलकी, दृढनिश्चय आणि एकमेकांच्या सामूहिक पाठिंब्याने प्रेरित होऊन आदरणीय ग्राहक आणि रूग्णांना प्लास्टिक सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी, कॉस्मेटिक प्रक्रिया, लेसर ट्रीटमेन्ट्स आणि लेसर सर्जरी मधील सर्व प्रकारच्या सेवा आणि सुविधा अतिशय कार्यक्षमरित्या, प्रभावीपणे आणि व्यापक काळजी घेऊन देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असेल. आमच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीमध्ये आम्ही सतत सुधारणा करून त्यांचे संपूर्ण समाधान होईल याची दक्षता घेऊ.